
पिंपळीत मोटारीची ट्रकला धडक
चिपळूण:- पिंपळी येथे ट्रक आणि मोटारीच्या अपघातात पाटण तालुक्यातील दोघे जखमी झाले. ३ मे रोजी रात्री ८ वाजता हा अपघात झाला. पिंपळी नुराणी मोहल्ला येथे हा अपघात झाला. मानसिंग संतोष माने (रा. कासेगाव, जि. सांगली) हे मोटार (एमएच १० ईई ०१४८) घेऊन कऱ्हाड ते चिपळूण असा प्रवास करत होते. पिंपळी येथे आल्यानंतर त्याने वाहन वेगाने चालवण्यास सुरुवात केली. माने याचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोरून येणाऱ्या ट्रक (एमएच २६ बीई १७५१) त्यांची मोटार धडकली. या अपघातात साधी संदीप साळुंखे (रा. पाटण) आणि संचित माने हे जखमी झाले आहेत.