225 बसेच मतदान साहित्याची करणार वाहतूक
रत्नागिरी :जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी 225 बसेस मतदान साहित्याची वाहतूक करणार असून सर्वांनी सहकार्य करणे गजरेचे असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामासाठी एस. टी. च्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्यांची त्या त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.
मतदार साहित्याची वाहतूक करण्यासाठी 225 एस. टी. च्या बसेस घेण्यात आल्या असून त्यामध्ये रत्नागिरी मतदारसंघात 41, राजापूर मतदारसंघात 54, चिपळूण मतदारसंघात 29, गुहागर मतदार संघात 44 आणि दापोली मतदारसंघात 57 एस. टी. गाडयांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 7 तारखेला होणार्या मतदानासाठी शासकीय यंत्रणेकडून पूर्णपणे तयार करण्यात आली असून रत्नागिरी विभागाच्या 225 गाड्या सतत दोन दिवस कार्यरत ठेवल्या जाणार आहेत. या गाड्यांमधून मतदान साहित्य व कर्मचारी यांना प्रत्येक मतदान केंद्रावर घेवून जाणेव पुन्हा परत आणण्याची जबाबदारी एस. टी. महामंडळावर सोपविण्यात आली आहे.