
खेड-दापोली मार्गावर अपघात, रिक्षाचालकासह दोघे जखमी
खेड : खेड-दापोली मार्गावरील नाना-नानी पार्कजवळ मालवाहू रिक्षा टेम्पो व रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह रिक्षातील दोघे प्रवासी जखमी झाले. या अपघातप्रकरणी कृष्णा सुरेश मेस्त्री (३६, रा. कशेडी- सुतारवाडी) याच्यावर येथील पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक इर्षाद इसाक अडरेकर याच्यासह रिझवाना जोहर चिकटे, अल्फिया मुब्बीर काझी (दोघे रा. खोंडा- दापोली) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. रिक्षाचालक इर्षाद अडरेकर हे रिक्षा (एम. एच.०८/ ए.क्यु. ४९४८) घेवून जात असताना खेड-दापोली मार्गावरील भरणे ते चिंचघरदरम्यान टेम्पोला (एम. एच.०८/ ए.क्यु. ७९३०) समोरासमोर धडक झाली. यामध्ये रिक्षातील दोघांना गंभीर दुखापती झाल्याने तातडीने उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. पोलिसांना याची खबर मिळताच घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य केले.