
वृद्धेच्या एक लाखाच्या बांगड्याची चोरी
चिपळूण : येथील मध्यवर्ती बसस्थानकातून सोनगावकडे निघालेल्या वयोवृद्ध महिलेच्या हातातील बांगड्या चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता. ३) घडली. त्याची किंमत सुमारे एक लाख आहे.
याबाबत सुनीता यशवंत घाग (वय ७५) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या सोनगावहून चिपळूणला डॉक्टरकडे आल्या होत्या. दुपारी १ च्या चिपळूण-खेड एसटीने घरी जात होत्या. बसमध्ये बसण्यासाठी गर्दी झाली होती. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी घाग यांच्या हातातील बांगड्या चोरल्या.