
अपघात प्रकरणी महिंद्रा पिकअप व्हॅन चालकावर गुन्हा
खेड :मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगर येथे पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या खासगी आराम बसला महिंद्रा पिकअप व्हॅनने पाठीमागून दिलेल्या धडकेत आदिती ब्रिजेश डिंगणकर हिचा जागीचा मृत्यू झाल्याप्रकरणी पिकअप व्हॅन चालकावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वास धोंडिराज देसाई (५९, रा. मालाड) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. तो टेम्पो (एम.एच.०४/के.एफ. ८५४७) घेवून जात असताना नातूनगर फाटा येथे पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या खासगी आराम बसला (एम.एच.४८/बी.एम. १३४०) पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या उजव्या बाजूस मागून दोन नंबरच्या खिडकीजवळ बसलेल्या आदिती डिंगणकर या ७ वर्षीय बालिकेची मानच छाटली गेली. बसमधील अन्य एक प्रवासीही किरकोळ जखमी झाला- होता.