
टेम्पोची दुचाकीला धडक, दोघे जखमी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडेनजीक टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नी जखमी झाले. याप्रकरणी टेम्पोचालक चिराग राजेश आगीने (२३ रा. शिवतररोड-खेड) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन वसंत कदम, नियती नितीन कदम (दोघेही रा. परशुराम-दुर्गवाडी, चिपळूण) अशी जखमी पती-पत्नीची नावे आहेत. ते दोघे दुचाकीने (एम.एच. ०८ ए.डब्यू ७४७३) जात असताना टेम्पोने ( एम.एच. ०८ ए.पी. ३५५०) दुचाकीला डाव्या बाजलने धडक देऊन अपघात केला. या अपघातात दोघांनाही दुखापती झाल्या असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी उशिरा टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.