
मतदार जनजागृती पथक (स्वीप) शहरी विभाग यांचेकडून मारुती मंदिर व मांडवी बीच येथे पथनाटयाचे आयोजन
रत्नागिरी :४६-रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ मध्ये नागरिकांनी १०० टक्के मतदान करावे या करीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत.
याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा लोकसभा निवडणूक २०२४ स्वीप टीम चे जिल्हा सहाय्यक नोडल अधिकारी (शहरी) श्री. तुषार बाबर यांनी स्वीप जनजागृती मोहिमे अंतर्गत मतदानाचे जनजागृती करणे करीता शुक्रवार दिनांक २६/०४/२०२४ रोजी मारुती मंदिर आणि मांडवी बीच रत्नागिरी येथे पथनाटयाचे आयोजन केले होते. या पथनाट्यामध्ये १८ वर्षांवरील व मतदार यादीमध्ये नोंद असलेल्या नागरिकांनी मतदान करावे. तसेच दिव्यांग नागरीकांना मतदानाकरिता घरपोच वाहन सुविधा व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी होम पोस्टल मतदानासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तरी नागरिकांनी ७ मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये आपल्या आवडीच्या उमेदवाराला आधी मतदान नंतर इतर काम करा असे आवाहन करण्यात आले. या पथनाटयाला नागरिकांचा भरपूर प्रतिसाद देखील मिळाला, सदरचे पथनाट्य हे स्वीप मोहीम अंतर्गत कार्यरत सहा. गटविकास अधिकारी श्री. चेतन शेळके, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुधाकर मुर्कुटे, व केंद्र प्रमुख श्री. विष्णू पवार यांच्या मार्गदर्शना खाली मतदान जनजागृती पथक प्राथमिक शिक्षक विभागातील शिक्षक तथा शिक्षिका यांनी पथनाट्य सादर केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी ही उपमुख्याधिकारी श्री. प्रवीण माने रत्नागिरी शहर नोडल अधिकारी स्वीप (शहरी), तसेच लेखापरीक्षक श्री. हिम्मतराव पाटील, स्थापत्य अभियंता श्री. सुदर्शन माकोडे, कर निरीक्षक श्री. मयुर बेहरे, श्रीमती. मंजिरी कारकर वरिष्ठ लिपिक, धनंजय भोसले वरिष्ठ लिपिक, व लिपिक हेमंत वायंगणकर या सहकारी अधिकारी कर्मचारी यांची होती.