
खेडशी येथून ट्रान्स्फॉर्मरच्या पट्ट्यांची चोरी
रत्नागिरी, : कोकण रेल्वेच्या गयाळवाडी खेडशी साईड येथील इलेक्ट्रिक ट्रान्स्फॉर्मरसाठीच्या तांब्याच्या पट्ट्या व डीपीमधील ऑईल असा २९ हजाराचे साहित्य अज्ञाताने चोरल्याची तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. काल हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इलेक्ट्रीक ट्रान्फॉरमरसाठी जोडण्यात आलेल्या तांब्याच्या व पट्टया व डीपी मधील ऑईल चोरट्याने लांबविले आहे. हत्याराने तांब्याच्या पट्टया कापुन तसेच डी.पी.चे झाकण उघडून त्यातील ऑईल (वंगण) चोरून नेले असे तक्रारीत म्हटले आहे.