
दुचाकी अपघात प्रकरणी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:-तालुक्यातील निवळी-जयगड रस्त्यावरील चाफे येथे निष्काळजीपणे दुचाकी चालवून बल्करला धडक देणाऱ्या दुचाकी चालकाविरूद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला 10 एप्रिल 2024 रोजी घडलेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले होते. राहूल कमलाकर नाईकनवरे (35, रा.धाराशीव, सध्या निवेंडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल नाईकनवरे हा 10 एप्रिल रोजी दुचाकी (एमएच 08 एपी 2879) घेवून निवळी- जयगड रस्त्याने जात होता यावेळी त्याच्या दुचाकीवर आयुष अक्षय गायकवाड (8) हा मागे बसला होता. राहुल हा चाफे पेट्रोलपंप अलिकडे आला असता समोरून येणाऱ्या बल्करला त्याची धडक बसली. या अपघातात राहुल व आयुष हे दोघे जखमी झाले. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी राहुल याच्याविरूद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी भादंवि कलम 279,337 नुसार गुन्हा दाखल केला.