
बीएसएनएल टॉवरसाठीच्या बॅटरी नेल्या चोरून
देवरुख: येथे बीएसएनएल एक्सचेंज ऑफीस करता बसवलेल्या व हातीव येथील बीएसएनएल टॉवरसाठी बसवलेल्या बॅटरी अज्ञाताने चोरुन नेल्या. याप्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 6 मार्च 2024 ते 8 एप्रिल 2024 या कालावधीत घडली आहे. त्यानुसार, अज्ञाताने बीएसएनएल एक्सचेंज ऑफीससाठी बसवलेली 12 हजार रुपयांची एच.बी.एल कंपनीची व्हि.आर.एल.ए 400 ए.एच बॅटरी आणि हातीव येथील टॉवरसाठी बसवलेली 24 हजार रुपयांची स्टार प्लस कंपनीची व्हि.आर.एल.ए 1000 ए.एच.बॅटरी अशा एकूण 36 हजार रुपयांचा दोन बॅटर्या अज्ञाताने चोरुन नेल्या. संशयिता विरोधात भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.