
बोरज येथे बोअर बंदूकीसह जीवंत काडतुसे जप्त
खेड:- खेड तालुक्यातील बोरज येथील अनिल भिखू गुहागरकर (वय – ५३वर्षे) यांच्या ताब्यातील बोअर बंदूक आणि जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. तसेच याच गावातील राजेश गजानन साळवी यांच्याकडे विनापरवाना बंदुक रत्नागिरी गुन्हा अन्वेषण शाखेने जप्त केली.
अनिल गुहागरकर यांच्याकडे जप्त केलेली बोअर बंदूक ही २५ हजार – रुपयांची असून त्यांच्याकडे ८ जीवंत काडतुसे ज्याची किंमत २,हजार ४०० रुपये आहे. तर राजेश साळवी यांच्याकडे सापडलेली एक सिंगल बोअर बंदूक २५ हजार रुपयांची असून १ हजार ,२००- रुपये किंमतीची ४ जीवंत काडतुसे सापडली आहेत. भारतीय हत्यार अधिनियमप्रमाणे पीएसआय आकाश साळुंखे व त्यांचे सहकारी आंबेकर, साळवी, नार्वेकर यांनी कारवाई केली .