
चिपळुणात आणखी दोन बांगलादेशीना पोलिसांनी पकडले
चिपळूण :काही महिन्यांपूर्वी तीन बांगलादेशींना रत्नागिरीच्या दहशतवादविरोधी पथकाने खेर्डी येथून व त्यानंतर डेरवण येथून दोघांना अटक केली होती. मात्र, बुधवारी येथील पोलिसांनी आणखी दोन बांगलादेशींना शहरातील मतेवाडी येथून ताब्यात घेत अटक केली आहे. तसेच त्यांची चौकशी सुरू केली आहे.
रुख्साना अलमगीर मंडल, अलमगीर अरबी मंडल (दोन्ही रा. रावतळे, मतेवाडी, चिपळूण) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून त्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. बांगलादेशातून घुसखोरी केलेले दोघेजण रावतळे-मतेवाडी येथे काही वर्षे वास्तव्याला होते. मात्र गुरुवारी त्या दोघांना चिपळूण पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे असलेली काही कागदपत्रे जप्त केली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने व पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. त्यानंतर त्यांच्याकडील कागदपत्रे जप्त करत त्यांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे.