
खेडमध्ये १ लाखाचे दोन मोबाईल लंपास
खेड : खेड शहरातील नाना-नानी पार्क येथील जिजाऊ खानावळ या बंदावस्थेतील हॉटेलच्या पुढील मोकळ्या बाजूस झोपलेल्या एकाचे १ लाख रूपये किंमतीचे दोन मोबाईल व घड्याळ अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
त्यानुसार अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अमोल सोपान होळकर (३१, रा. खंडाळा-सातारा, सध्या रा. खेड) यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. १६ ते १७ एप्रिल या कालावधीत जिजाऊ खानावळ या बंदावस्थेतील हॉटेलमध्ये पुढील मोकळ्या शेडमध्ये अंथरूण टाकून झोपले होते. त्यांच्या झोपेचा फायदा घेत चोरट्याने मोबाईलसह घड्याळावर डल्ला मारला.