
रत्नागिरी- सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना उमेदवारी
रत्नागिरी:- रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना होणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला सोडली आहे. नारायण राणे हेच रत्नागिरी – सिंधुदुर्गचे उमेदवार असतील, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.