
विनयभंग प्रकरणातील चौघांना जामीन मंजूर
चिपळूण :वृद्ध महिलेचा विनयभंग केल्याने त्याविषयी जाब विचारण्यासाठी गेलेल्या त्या महिलेसह तिच्या कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील एका गावात घडली होती. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता, जामीन मंजूर करण्यात आला आहे.
संदीप शिर्के, संतोष शिर्के, विशाल निचोरे, अनिल शिर्के (सर्व रा. मुंढे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पीडित महिला तिच्या घरी असताना संदीप शिर्के तेथे आला व त्याने त्या महिलेला अपशब्द बोलून तिच्याशी गैरवर्तन केले. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तो पळून गेला. याप्रकरणी संदीपला जाब विचारण्यासाठी गेलेली पीडित महिला व तिचा मुलगा व पुतण्या यांना चौघांनी मारहाण केली, अशी फिर्याद आहे. याबाबत अधिक तपास अलोरे-शिरगाव पोलिस करत आहेत.