
राजापूर तालुक्यातील उपळे प्रिंदावण रस्त्याच्या कडेला आढळला मृत रान गवा
राजापूर:- तालुक्यातील उपळे प्रिंदावण रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामध्ये रानगवा मृतावस्थेत सापडल्याची माहिती राजापूर वनविभागाने दिली आहे . सदरचा रानगवा मानेवर उलटा पडुन मृत झाला असल्याचा अहवाल पशुवैद्यकिय अधिकाऱ्यानी दिला आहे .
याबाबत राजापूर वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक 15/04/2024 रोजी दुपारी 2.00 वाजण्याच्या सुमारास उपळे प्रिंदावन रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांमध्ये रानगवा वन्य प्राणी मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती उपळे पोलिस पाटील महेश जानु कांबळे यांनी वनपाल राजापूर यांना फोन वरून माहीती दिली . त्यानंतर सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवले.
त्यानंतर वनपाल राजापूर यानी वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी येऊन पाहणी केली तेव्हा सदर चा गवा हा मानेवर उत्तर पूर्व दिशेस मृत आवस्थेत पडला असल्याचे दिसुन आले . त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी राजापूर व सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी पहाणी केली असता सदर मृत गवा हा नर जातीचा असुन त्याचे वय साधारण चार ते पाच वर्षे असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यानी सांगितले आहे .
सदरचा मृत गवा हा मानेवर डाव्या बाजूला पडुन पुढे वीस ते बावीस फुट अंतरावर खाली घसरत रस्त्याच्या नाल्यांमध्ये मानेवर पडला असल्याचे दिसून आले . तर घसरत असताना काटेहसन झाडाचे काटे पोटावर लागल्याच्या खुनाही दिसुन आल्या . या खुना साधारण एक इंच खोलवर गेलेल्या असुन सदरच्या मृत रानगव्याची शिकार किंवा त्याला विषबाधा झाली आहे का याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी व वन अधिकारी यांनी केली.
या मृत रानगव्याचे शवविच्छेदन केल्यानंतर तो मानेवर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल पशुवैद्यकीय अधिकारी राजापूर यांनी दिला आहे . त्या नंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे , वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली लाकडाची चिता रचून या रानगव्याला जाळून नष्ट करण्यात आले . सदर कामगिरी साठी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे रत्नागिरी चिपळूण, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार वनपाल सदानंद घाटगे , वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, गणेश गुरव, निलेश म्हादये , अनिकेत मोरे व सरपंच श्रीम प्रिती शिवणेकर , माजी सभापती कमलाकर कदम, पोलिस पाटील उपळे महेश कांबळे, पोलिस पाटील प्रिंदावण रवींद्र देवधर, तंटामुक्ती अध्यक्ष दुर्गादास घाडी , प्रिंदावण तंटामुक्ती अध्यक्ष सुरेंद्र पाटिल , रामचंद्र गुरव प्रशांत शिवनेकर, माजी उप सभापती अश्विनी शिवणेकर ,तसेच उपळे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केली आहे.