
ड्युटीवर असताना ऑपरेटरचा हृदयविकाराने मृत्यू
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ड्युटीवर असताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला लोटेतील परशुराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचे २२ मार्चला पहाटे मृत्यू झाला. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी अनंत पाटील (वय ५२, रा. धामणदेवी नवीन वसाहत) हे लोटे येथील एका कंपनीत ऑपरेटर म्हणून काम पाहत होते. ड्युटीवर असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने सहकारी कर्मचारी यांनी त्यांना उपचाराकरिता परशुराम हॉस्पिटल लोटे येथे घेऊन गेले. उपचार सुरू असताना ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.