
दोन विशेष रेल्वे गाड्याना जोडणार १ स्लिपर कोच
रत्नागिरी:- होळी सणामुळे वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन विशेष गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येकी एक स्लीपरचा डबा वाढवण्यात आला आहे. कोकणच्या चाकरमान्यांसाठी २ विशेष गाड्या त्यात १ स्लिपर कोच त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे तरीही असंख्य कोकणी चाकरमानी मिळेलत्या रेल्वेने गर्दीतच गावी येवून पोहोचले आहेत.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उधना ते मंगळुरू (०९०५७) या विशेष गाडीला सुरत जवळील उधना येथून २४ मार्च २०२४ रोजी ‘सुटणाऱ्या फेरीसाठी तर मंगळुरू ते उधना (०९०५८) या २५ मार्च २०२४ रोजीच्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.
याचबरोबर अहमदाबाद ते मडगाव (०९४१२) या कोकण रेल्वे धावणाऱ्या दुसऱ्या विशेष गाडीला अहमदाबाद येथून सुटताना २५ मार्च रोजी च्या फेरीसाठी तर मडगाव ते अहमदाबाद ( ०९४११) या मार्गावर धावताना दिनांक २७ मार्च २०२४ रोजी स्लीपरचा एक जादा डबा जोडण्यात येणार आहे.