
अपघातात जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
खेड : मोरवंडे-सुतारवाडी येथील अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचे चिपळूण येथील रुग्णालयात उपचारादरम्यान २१ मार्चला सकाळी मृत्यू झाला. राजाराम गणपत काणेकर (वय ७८) असे त्यांचे नाव आहे. काणेकर यांचा तालुक्यातील शिवफाटा येथे अपघात झाल्याने त्यांना उपचाराकरिता चिपळूण येथील रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.