
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
खेड : तालुक्यातील लवेल नवानगर येथील कमलाकर दत्ताराम जाधव (वय ३८) यांनी राहत्या घराच्या खोलीतील लाकडी भालाला कपड्याच्या साहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना २० मार्चला रात्री ते २२ मार्चला दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. येथील पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.