
शिळ-कदमवाडी जंगलमय भागातील दारु अड्यावर पोलिसांची धाड
रत्नागिरी ः तालुक्यातील शिळ-कदमवाडी येथील जंगलमय भागातील दारु अड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये साहित्यासह १२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. महेश भार्गव शिंदे (रा. प्रशांत नगर, मजगाव रोड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २१) दुपारी अडीचच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताकडे विनापरवाना हातभट्टीची दारु बनविण्याचे १२ हजार शंभर रुपयांचे साहित्य सापडले. यामध्ये गुळ, नवसागर मिश्रीत कुचके रसायन आदींचा समावेश होता. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.