
रेल्वेत मोबाईल चोरट्यास पोलिसांकडून अटक
चिपळूण : दिवा-चिपळूण या रेल्वेगाडीत प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यास मंगळवारी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
अमित तुळशीराम गायकवाड (३२, दिवा, मुंबई) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सुनील विठोबा कदम (रेल्वे पोलिस) यांनी दिली दिवा-चिपळूण या रेल्वेगाडी रात्री चिपळूण रेल्वे स्थानकादरम्यान आली असता, अमित हा प्रवाशाचा मोबाईल चोरत होता. हा प्रकार त्या प्रवाशाच्या लक्षात आल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडून प्रवाशांनी चिपळूण रेल्वेस्थानकातील रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. अमितने ३ हजार व २ हजाराचे दोन चोरलेले मोबाईल जप्त केले आहेत.