
संगमेश्वर येथील अपघातात कार चालकावर गुन्हा दाखल
संगमेश्वर:मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बस स्थानकानजिक झालेल्या एसटी बस आणि कारमध्ये अपघाता झाला होता. या अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची माहिती बस चालक अर्जुन अण्णासाहेब भोगडे यांनी (राहणार देवरुख) संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती.
राज्य परिवहन महामंडळाची करजुवे ते संगमेश्वर (बस क्रमांक MH14 BT 2057) ही घेऊन अर्जुन अण्णासाहेब भोगडे हे संगमेश्वरच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. अपघातग्रस्त कार गोव्याहून मुंबईच्या दिशेने चालक मारिओ भिंगेस, (बांद्रा, मुंबई ) हे कार घेऊन जात होते. ते संगमेश्वर बस स्थानकाजवळ आले असता त्यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने मारिओ यांचा कारवरील ताबा सुटला. कार बसला जाऊन धडकली. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघाताप्रकरणी कार चालक मारिओ यांच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.