शिळ येथे विनापरवाना दारू पोलिसांनी केली जप्त
रत्नागिरी:- शहराजवळील शिळ- नागवेकरवाडी येथे पोलिसांनी विनापरवाना हातभट्टी दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत २७५ रुपयांची पाच लिटर दारू जप्त केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक शंकर नागवेकर (रा. शिळ- नागवेकरवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.
हा प्रकार रविवारी (ता. १७) सायंकाळी नागवेकरवाडी रस्त्याच्या बाजूला झाडीझुडपाच्या आडोशाला निदर्शनास आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित दीपक नागवेकर यांच्याकडे विनापरवाना २७५ रुपयांची पाच लिटर हातभट्टीची दारु विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आली.