
नाटे येथे विनापरवाना हातभट्टी दारु विक्रीवर छापा
रत्नागिरी ः नाटे (ता. राजापूर) येथे घराच्या पाठीमागील बाजूस विनापरवाना गावठी हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५४० रुपयांची नऊ लिटर दारु पोलिसांनी जप्त केली. नाटे पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोविंद कोंडीबा गोरे असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ११) रात्री साडेआठच्या सुमारास नाटे येथे घराच्या पाठीमागील बाजून आंब्याच्या झाडाच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाई संशयिताकडे ५४० रुपयांची नऊ लिटर दारु सापडली. या प्रकरणी पोलिस शिपाई दिगंबर ठोके यांनी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.