
दापोली दाभोळ येथे वृद्धाची आत्महत्या
दापोली:-दापोली तालुक्यातील दाभोळ दालेश्वर पाखाडी येथे चंद्रकांत शंकर पानकर या 65 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना 09 मार्च रोजी दुपारी 2:30 ते 3:30 या मुदतीत घडली.
दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत पानकर यांना दारूचे व्यसन होते. सध्या सहा महिन्यापासून त्यांना व्यवस्थित दिसत नसल्यामुळे ते घरातून कोठेही जात नसत. ते दिवसभर घरीच असायचे दारू पिण्याकरता जाता येत नाही. याचा त्यांना मानसिक त्रास होत असल्याने 9 मार्च रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घरात सर्वांसोबत दुपारचे जेवण केले . जेवण झाल्यानंतर घराच्या पाठीमागील पडवीत लाकडी भालाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. दाभोळ पोलीस स्थानकात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दाभोळ पोलीस करीत आहेत.