
एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित द कडवई इंग्लिश स्कूल या विद्यालयात साजरा झाला जागतिक महिला दिन.
रत्नागिरी :द कडवई इंग्लिश स्कूल या विद्यालयामध्ये प्रतिवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त महिला पालकांकरिता विशेष कार्यक्रमांचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रांजल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. स्वतंत्र भारताच्या विकासामधलं महिलांचे योगदान हे वाखण्यजोग आहे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करणारा आणि त्यांच्या कर्तुत्वाचा जागर करणारा हा कार्यक्रम फार उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी डॉक्टर अश्विनी नारकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या महिलांच्या वाढत्या वयानुसार आरोग्य विषयक येणाऱ्या समस्या आणि घ्यावयाची काळजी यासंदर्भात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जागतिक महिला दिनानिमित्त सुपरमॉम कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आले होते या कॉम्पिटिशन साठी डॉक्टर अश्विनी नारकर त्याचबरोबर सौ जहाँआरा मोडक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आणि चार फेऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर 36 महिला सहभागी पालकांमधून पाच महिला पालकांना सुपर मॉम या किताबाने सन्मानित केले गेले. कार्यक्रमादरम्या पाण्याचे महत्व सांगणारी शॉर्ट फिल्म तहान उपस्थित त्यांना दाखवण्यात आली कार्यक्रमासाठी संसाध्यक्ष सादिक काझी, संस्था उपाध्यक्ष डॉक्टर अन्सार जुवळे, तहान शॉर्ट फिल्म चे कलाकार डॉक्टर भगवान नारकर, सुबोध कल्याना, डॉक्टर अश्विनी नारकर, जहाँआरा मोडक मुख्याध्यापक प्रांजल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.