
विनापरवाना मद्य प्राशन करणाऱ्या प्रौढावर गुन्हा
रत्नागिरी ः मद्य प्राशनाचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी विदेश मद्य प्राशन करणाऱ्या प्रौढाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. ७) सायंकाळी सातच्या सुमारास वरची निवेंडी येथील आंब्याच्या झाडाजवळ निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित निवेंडी येथे मद्य प्राशनाचा परवाना नसताना मद्य प्राशन करताना आढळला. या प्रकरणी पोलीस हवालदार राहुल घोरपडे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.