
कुरवळ जावळीत एकास मारहाण
खेड : तालुक्यातील कुरवळ जावळी येथे सामाईक घराच्या मालकी हक्कावरून झालेल्या वादातून एकास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी सुहास रामदास पवार याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत गोरखनाथ सावळाराम पवार यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या दोन भावांमध्ये गेल्या ३ वर्षांपासून सामाईक घराच्या मालकी हक्कावरून वाद सुरू आहे. या वादातूनच संशयिताने फिर्यादीच्या हातावर लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.