
चोरीच्या प्रयत्नातील दोघा संशयितांना अटक
खेड : तालुक्यातील धामणादिवी गावच्या हद्दीत व परशुराम घाटातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच मैत्री कट्टा टपरीचे कुलुप दगडाने तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.
मनीष महेश गुरव (वय १९, रा. मोसम – गुरववाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) व मनोज सूर्याजी आयरे (२८, रा. गवाणे गावठणवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.