रत्नागिरी जिल्हा टु व्हिलर,थ्री व्हिलर मॅकॅनिक व गॅरेज मालक असोसिएशन यांचे मोफत ब्रेकडावून सर्व्हिस कॅपचा शुभारंभ
रत्नागिरी :येथील हातीस उरुसानिमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात,अशा वेळी भाविकांच्या वाहनांमध्ये बिघाड झाल्यास पर्याय काही नसतो म्हणून रत्नागिरी जिल्हा टु व्हिलर, थ्री व्हिलर मॅकॅनीक व गॅरेज मालक असोसिएशन यांचे वतीने दि.24 व 25 फेब्रुवारी असे दोन दिवस कॅंप आयोजित करण्यात आला.ही सेवा सन 2006 पासून अविरतपणे सुरू असून ती पूर्ण पणे मोफत आहे.या कॅंप चां शुभारंभ संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर व सामाजिक कार्यकर्ते संजय वैशंपायन यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी पत्रकार व एनजीओ चे रत्नागिरी तालुका अध्यक्ष जमीर खलफे,सचिव युसुफ शिरगांवकर, कोऑर्डिनेटर सौ निकीता कांबळे उपस्थित होते.यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ढेरे उपस्थित होते.
या कॅंप साठी संस्थेचे सर्व मॅकॅनीक सर्वतोपरी मदत करतात असे असोसिएशनचे अध्यक्ष फय्याज खतीब यांनी सांगितले

