
माभळे सडा येथे वणव्यामुळे पंधरा एकरातील झाडे जळून खाक
संगमेश्वर:- संगमेश्वर जवळच्या माभळे सडा येथे लागलेल्या वणव्यामुळे पंधरा एकरवरील आंबा, काजू तसेच इतर झाडे जळून खाक झाली आहेत. यामुळे शेतकयांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी हा वणवा लागला.
माभळे गवळवाडी ते सडा या दरम्यान लागलेला वणवापासून इतर क्षेत्रातील काजू आंबा तसेच इतर झाडे जळून खाक झाली आहेत. मंगळवारी दुपारच्या सुमारास अज्ञाताने आग लावली त्यामुळे आगीचा मोठा भडका उडून ती पूर्ण सड्यापर्यंत पसरली. वणवा लागल्याचे समजतात शेतकऱ्यांनी धाव धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र वणवा क्षेत्र जास्त असल्याने दोन तास झाले तरी आग आटोक्यात येत नव्हती. शेतकयांनी सर्व बाजूने प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.