
कळंबणीनजीक रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू
खेड:- खेडमधील कळंबणी बुद्रुकनजीक कोकण रेल्वेच्या धडकेत एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री 1.45 वाजण्याया सुमारास घडली.
वाहिद गुलाम मोहम्मद परकार असे मृत प्रौढाचे नाव आहे. ते रूळ ओलांडत असताना मुंबईकडे जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसने धडक दिली. या धडकेत ते जागीच गतप्राण झाले. याबाबत रेल्वे कर्मचाऱ्याच्या निदर्शनास रूळावर पडलेला मृतदेह दिसून आला. पोलीस स्थानकात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.