
भाट्ये येथे शिवजयंतीसह हरजी, मायाजी भाटकर जयंती साजरी
रत्नागिरी:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज भंडारी समाज संघाने भाट्ये गावातील थोर शिवकालीन भंडारी योद्धा सुभेदार मायाजी भाटकर व बालयोध्या हरजी भाटकर यांच्या समाधीस्थळी त्यांची जयंती साजरी केली.
आरमार सुभेदार मायाजी भाटकर यांनी भाट्ये येथील रवळनाथ मंदीराजवळ सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या मोहिमेचा विडा उचलला त्यांच्या सोबत त्यांचे १२ वर्षांचे पुतणे हरजी भाटकर हे सुद्धा मोहिमेत सहभागी झाले. सुवर्णदुर्गची घनघोर लढाई सुभेदार मायाजी भाटकर यांनी जिंकली परंतु त्यांचे पुतणे बालयोद्धा हरजी भाटकर या युद्धात कामी आले. थोर पराक्रमी शिवकालीन आरमार सुभेदार मायाजी भाटकर यांच्या समाधीस्थळावर जाऊन भंडारी महासंघाचे कार्यकर्ते समाधीचे दर्शन घेऊन गेली सतरा वर्षे शिवजयंती साजरी करत आहेत हे भूषणावह आहे.
भंडारी समाजाचे संघाचे अध्यक्ष राजीव कीर यावेळी म्हणाले की भंडारी समाजाबद्दल अभ्यास व समाजातील थोर पराक्रमी महापुरुषांचा सन्मान झाला पाहिजे. आरमार सुभेदार मायाजी भाटकर आणि अवघा वय वर्षे १२ असणार बालयोध्या हरजी भाटकर या शूरवीरांचे भव्य पुर्णाकृती स्मारक भाट्ये गावाच्या मुख्य चौकात व्हावे अशी स्पूर्तीदायी भावना श्री भाई विलणकर यांनी व्यक्त केली. या भाट्ये गावाला शिवकालीन इतिहास आहे आणि त्याचे साक्षीदार म्हणजे या गावातील मुरकर, देवकर, तळेकर, भाटकर या नावात आहे अशी माहिती ग्रामस्थ आप्पा भाटकर यांनी दिली. सुभेदार मायाजी भाटकर यांचे वंशज श्री मारुती भाटकर व संतोष भाटकर, गावाचे माजी सरपंच पराग भाटकर, राकेश भाटकर भाट्ये ग्रामस्थ , भंडारी संघाचे पदाधिकारी, माजी सरपंच सुरेंद्र भाटकर , ॲड प्रज्ञा तिवरेकर ,सुरेंद्र घुडे , प्रसाद उर्फ बापू गवाणकर , प्रविण रुमडे , दिलीप भाटकर , चंद्रहास विलणकर , अनंत भाटकर ,आर के विलणकर , प्रविण रुमडे , दिपक तोडणकर , निलेश बिर्जे , दिलीप भाटकर , दयाताई चवंडे यांनी मायाजी भाटकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शिवजयंती साजरी केली.