
ओरी बोध्दवाडी येथे बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी गुन्हा
रत्नागिरी ः
तालुक्यातील ओरी बोध्दवाडी येथे बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीसाठी बाळगणार्या महिले विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वा. करण्यात आली.
सोमवारी सायंकाळी ग्रामीण पोलिस ओरी येथून गस्त घालत असताना त्यांना त्याठिकाणी एक महिला लाकडाचे खोपीजवळ हातभट्टीची 285 रुपयांची 5 लिटर दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना दिसून आली. पोलिसांनी तिच्याकडील सर्व मुद्देमाल जप्त केला असून तिच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.