
चिपळूण तालुका मराठा मोर्चाच्या वतीने १९ रोजी शिवजयंती महोत्सव
चिपळूण:- चिपळूण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवार दि १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत चिपळूण मराठा क्रांती मोर्चा च्या पदाधिकारी यांनी दिली.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पदाधिकारी सतीश कदम यांनी सांगितले की, दरवर्षी प्रमाणे शिवजयंती उत्सव होत आहे. या शिव जयंती महोत्सवाची रूपरेषा सांगितली. यामध्ये सकाळी ८ वाजता शिव पुतळ्याचे पूजन व अभिवादन, दुपारी ३ वाजता हॉटेल अतिथी इथून रॅलीचे नियोजन होईल. या दरम्यान कोल्हापूर येथील प्रसिद्ध झांज पथक व मर्दानी खेळाची प्रदर्शन व सादरीकरण चिपळून नगर परिषद समोर, चिंचनाका, इंदिरा गांधीं सांस्कृतिक केंद्र, मार्कंडे आणि हायवे येथे होणार आहे. संध्याकाळी ४ ते ६ वाजता हॉटेल अतिथी समोर मर्दानी साहसी पथकांचे विशेष प्रदर्शन व सादरीकरण, संध्याकाळी ५ ते ७ वाजता हळदी कुंकू महिलांचा कार्यक्रम होईल. यामध्ये फनी गेम्स व इतर कार्यक्रमाचा समावेश असेल.
रात्री ७ ते ९.३० वाजता पंचम प्रस्तुत शिवस्वराज्य गाथा हा कार्यक्रम होईल. या पत्रकार परिषदेला चिपळूण तालुका मराठा क्रांती मोर्चा चे पदाधिकारी पत्रकार सतीश कदम, प्रकाश देशमुख, प्रभाकर मोरे, कपिल शिर्के, हर्ष शिर्के, सतीश मोरे, संतोष सावंत देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले.