
वानर- माकड बंदिस्त करणेसाठी वन विभागाच्या ताफ्यात पिंजरे दाखल
रत्नागिरी : जिल्हयात वानर माकडांचा उपद्रव दिवसेंगणित वाढत चालला आहे. त्याचा बंदोबस्त करणेसाठीवनविभागाने पिंजरे बनविले आहेत. ते पिजरे तालुक्याच्या ठिकाणी आले आहेत. वानर व माकड यांना जेरबंद करण्यासाठी या पिंजरेचा उपयोग केला जाणार आहे .
▪️उपाय योजना म्हणून वानर पकडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करणेकरीता आवश्यक पिंजऱ्यांची तयारी करणेत आलेली आहे. यामध्ये तीन पिंजरे व एक रॅम पिजरा अशा चार पिंजऱ्यांचे एक प्रमाणे तयार करणेत आले आहे.
पिंजरा क्रमांक १ -/माक युनि- हा पिंजरा जमिनीवर ठेवलेला असुन त्याची सम दरवाजा असुन सदर दरवाजा रस्सीने उघड झाप करणेची सु आहे. यापिंजऱ्यामध्ये वानर/माकडांसाठी केळी, शेंगा, भाक इतर प्रकारचे खाद्य ठेवले जाते वानर / माकड खाद्य घेण्या पिंजऱ्यात येताच रस्सीने दरवाजा बंद केला जातो.
▪️पिजंरा क्रमांक दोन हा पिंजरा क्रमांक एक ला जोड असतो या दोन्हा पिंजऱ्यामध्ये दरवाजा असुन सदर दर रस्सीने उघड झाप करता येतो. पिंजरा क्रमांक एक मध्ये बं केलेले वानर माकड पिंजरा क्रमांक दोन मध्ये घेणेत ये पिंजरा क्रमांक दोन मध्ये ते बंदिस्त करुन पिंजरा क्रमांक एक दरवाजा नविन वानर / माकड बंदिस्त करणेसाठी उघडला
▪️पिंजरा क्रमांक दोनमध्ये बंदिस्त माकडाला सोडविण्यासाठी तसेच पिंजरा क्रमांक एक मधील खाद्य पळविणेसाठी इतर वानर/माकड पिंजऱ्याकडे येतात. अशा प्रकारे क्रमांक एक व पिंजरा क्रमांक दोन हे जमिनीवर माकड वानर पकडणे सोयीचे होते.
▪️रॅम्प पिंजरा क्रमांक ३ पिंजरा क्रमांक दोन मध्ये बंदिस्त केलेली वानर /माकडे गाडीतील पिंजऱ्यात चढविणेसाठी या रॅम्पचा वापर केला जातो यासाठी पिंजरा क्रमांक दोन ला रॅम्पचे बाजूने दरवाजा ठेवलेला आहे गाडीतील पिंजरा महिंद्रा पिकअप या गाडीमध्ये ७-९ फूट लांबी ३-९ फुट रुंदी व ४.०० फूट उंचीच पिंजरा तयार केलेला आहे. हा फिक्स पिंजरा असुन या पिंजऱ्यात दोन कंपार्टमेंट तयार केलेली आहेत. वानर माकडांच्या दोन टोळ्या असतील तर त्या आपआपसात मारामारी करतात एकावेळी वानर/माकडाच्या दोन टोळ्या आपण वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये ठेवु शकतो यासाठी ही रचना केलेली आहे. गाडीतील पिंजऱ्याचे दोन दरवाजे असुन एका दरवाजा रॅम्प पिंजऱ्याला जोडलेला आहे व दुसरा दरवाजा कंपार्टमेंटला जोडलेला आहे. रॅम्पला जोडलेला दरवाजा रस्सीने उघड झाप करणेची सोय आहे पिंजरा क्रमांक दोन मधील वानर माकड रॅम्पच्या साहय्याने गाडीतील पिंजऱ्यास घेण्यात येतात व ती कंपार्टमेंट एक किंवा दोन मध्ये ठेवली जातात. जेव्हा वानर माकडे पकडुन होतात त्यावेळी रॅम्प बाजुला करुन गाडीतील पिंजरा बंदिस्त करून पकडलेली वानर माकड याकडे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणेसाठी
वाहतुक केली जाणार आहे.
▪️जमिनीवरील पिंजरा क्रमांक एक व पिंजरा क्रमांक दोन हे दोन्ही पिंजरे फोल्डींग पद्धतीने बनविलेले असुन सहज सुलज पद्धतीने जोडता येतील व पुन्हा खोलाता येतील या पद्धतीने बनविले आहेत हे चारही पिंजरे एका बोलेरो पिकअप गाडीतून वाहतुक करता येतात वानर माकड पकडणेसाठी गावातील लोकांच्या सहयोगाने पिंजरा लावलेल्या ठिकाणी वानर माकड गोळा करुन आणल्यास तीन चार माणसे या वानर माकडांना पिंजऱ्यात जेरबंद करणेत पुरेसी आहेत. वानर माकडे खाद्याच्या लोभाने एकत्र आणावी लागतात यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य अपक्षीत आहे.