
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंड्याच्या तफावतीची रक्कम मिळणार.
रत्नागिरी :शाळेत देण्यात येणार्या प्रति अंड्यासाठी पाच रुपयांचा खर्च शासनाने निर्धारित केला आहे. मात्र, बाजारभावातील दरापेक्षा हा दर कमी असल्याने तक्रारी येत होत्या. ही तफावतची रक्कम मिळणार आह. तसे पत्र शिक्षण विभागाचे संचालकांनी काढले आहे. त्यामुळे पुरवठा धारकांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहाराचे वाटप केले जाते. जिल्हा परिषदेचे सन 2023 24 या शैक्षणिक वर्षामध्ये नियमित पोषण आहारासोबत पौष्टिक पदार्थ देण्यासाठी नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी देण्यात यावीत. तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रतिविद्यार्थी पाच रुपयांचा खर्च निर्धारित केला होता. मात्र, बाजारभावातील दरापेक्षा हा दर कमी असल्याने तक्रारी येत होत्या. सद्यस्थितीत अंड्यांचा बाजारभाव विचारात घेता एका अंड्यासाठी पाच रूपये दर निर्धारित केला आहे. मात्र सुमारे सहा ते सात रुपयांस अंडी विकत घेऊन ती उकडणे हा खर्च परवडत नसल्याचे पुरवठा धारकांतून सांगण्यात येत होते.
यामुळे नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटी यांच्या संकेतस्थळावरील महिन्याच्या दराची सरासरी काढून अंड्याची तफावत रक्कम देण्यात येणार आहे. तसे पत्र शिक्षण विभागाने काढले
आहे. त्यामुळे पोषण आहार देणार्या पुरवठा धारकांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.