
एसटी स्टॅन्डवरील चोरी प्रकरणी अटक महिलेची न्यायालयीन कोठडी
रत्नागिरी: काही दिवसांपूर्वी एसटीमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून रोख रक्कम आणि सोन्याची बांगडी लांबवणार्या महिलेला न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.
अनघा अनंत जोशी (63 मुळ रा. शिवाजीनगर, रत्नागिरी सध्या रा.जंगली महाराज रोड,पूणे) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. ही महिला सराईत गुन्हेगार असून तिच्यावर रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, पनवेल याठिकाणी 12 गुन्हे दाखल आहेत. तिच्याकडून चोरीतील 45 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही महिला सराईत गुन्हेगारा आहे. तिला न्यायालयाने प्रथम दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी तिच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.