
शकील गवाणकर, सचिन शिंदे, मुकेश गुंदेचा यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदयजी सामंत साहेबांच्या शिफारशीनुसार रत्नागिरी शहरातून शकील गवाणकर, मुकेश गुंदेचा, सचिन शिंदे यांची मा.जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी नियुक्ती केली आहे.
शकील गवाणकर हे पत्रकार असून ते संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष आहेत, मुकेश गुंदेचा हे संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे उपाध्यक्ष,रुपरजत गोशाळा तसेच भारतीय जैन संघटना चे पदाधिकारी आहेत,तर सचिन शिंदे हे संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे सल्लागार, मानवता संयुक्त संघाचे कोकण अध्यक्ष आहेत.