
दिव्यांगांना स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी
रत्नागिरी : आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी आणि युथ बिल्ड फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिव्यंग दिव्यांगांना स्वच्छता उत्पादने बनवणे या विषयावर तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच स्वयंरोजगार , उद्योग आधार नोंदणी, उद्योगासाठी अर्थसहाय्य याबाबत प्रशिक्षणाचे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षण शिबिराबाबत जाणीव जागृती कार्यक्रम सोमवार दिनांक 12/ 02/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता, आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरीच्या, परकार हॉस्पिटल समोर, शिवाजीनगर, रत्नागिरीच्या कार्यालयात आयोजित केला आहे. तरी इच्छुक दिव्यांगांनी नाव नोंदणीकरिता 1.UDID सर्टिफिकेट 2. आधार कार्ड 3. रेशन कार्ड 4. बँक पासबुक 5.पासपोर्ट साईझ 2 फोटो या कागदपत्रांसहित उपस्थित राहावे.
अधिक माहिती करिता 9834440200 या आस्था दिव्यांग हेल्पलाईनच्या नंबर वर कॉल करावा असे आवाहन श्री.अवधूत पावसकर जिल्हा समन्वयक युथ बिल्ड फाउंडेशन पुणे, आस्थाच्या सचिव श्रीम.सुरेखा पाथरे व जिल्हा हेल्पलाईन समन्वयक श्री.संकेत चाळके यांनी केले आहे.