
पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा
रत्नागिरी:- उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत रविवार दि.11 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा दौरा येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे
सकाळी १०.३० वाजता हेलिकॉप्टरने पाली हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने लांजा, जि. रत्नागिरी कडे प्रयाण, सकाळी ११.०० वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, लांजा कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळाला उपस्थिती, दुपारी १२.३० वाजाता लांजा, येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण,दुपारी, १.०० वाजता रत्नागिरी ग्रंथोत्सव- २०२३ उद्घाटन् समारंभास उपस्थिती स्थळ : शासकीय विभागीय ग्रंथालय, घारेघाट रोड, रत्नागिरी , दुपारी २.३० वाजता रत्नागिरी येथून मोटारीने जांभारी कडे प्रयाण, दुपारी ३.०० वाजता, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा जांभारी मराठी या शाळेच्या नूतन वर्गखोल्यांच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ : जि.प.शाळा, जांभारी , रत्नागिरी ,सांयकाळी ४.०० वाजता जांभारी येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण, ४.३० वा. शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव, ६.०० वाजता महासंस्कृती महोत्सव, रत्नागिरी उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, रात्री ९.०० वाजता रत्नागिरी येवून मोटारीने माभळे, काष्टेवाडी कडे प्रयाण,रात्री 10.00 वाजता नवतरूण मित्र मंडळ माभळे, काष्टेवाडी; श्री गणेश जयंती निमित्त श्री सत्यनारायण महापूजा व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा येथे सदिच्छा भेट,रात्री 10.30 वाजता माभळे, काष्टेवाडी येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, संगमेशवर कडे प्रयाण,10.45 शासकीय विश्रामगृह, संगमेशवर येथे राखीव, 11.50 वा. शासकीय विश्रामगृह, संगमेश्वर येथून मोटारीने संगमेश्वर रेल्वे स्थानक कडे प्रयाण, १२.०० वा. संगमेश्वर रेल्वे स्थानक येथून कोकणकन्या एक्सप्रेसने (गाडी नं.२०११२) मुंबई कडे प्रयाण असा दौरा कार्यक्रम आहे.