
वरवडे येथे विनापरवाना १० लिटर दारु जप्त
रत्नागिरी ः तालुक्यातील जयगड येथील वरवडे- भंडारवाडा येथे पोलिसांनी विनापरवाना गावठी हातभट्टी दारु विक्रीवर कारवाई
केली. या कारवाईत ६५० रुपयांची दहा लिटर दारु जप्त केली. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विवेक गजानन पाटील (वय ५७, रा. वरवडे-भंडारवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ८) सायंकाळी सातच्या सुमारास भंडारवाडा येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताकडे विनापरवाना हातभट्टीची
६५० रुपयांची १० लिटर दारु पोलिसांनी केलेल्या कारवाईत सापडली. या प्रकरणी पोलिस नाईक प्रसाद सोनावले यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.