
साठरेबांबर येथे दारु विक्रीवर कारवाई
रत्नागिरी ः तालुक्यातील साठरेबांबर-सावंतवाडा येथे घराच्या पाठीमागे विनापरवाना गावठी हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ३५० रुपयांची दहा लिटर दारु जप्त केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण कृष्णा नवले (वय ४५, रा. नवलेवाडी, वायंगणे, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ८) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास साठरेबांबर सावंतवाडा येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताकडे विनापरवाना गावठी हातभट्टीची दारु सापडली. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार संतोष कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.