
मनसे रत्नागिरी शहर आयोजित हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न
रत्नागिरी :महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर तर्फे रविवारी नगरपरिषद उद्यान, नरहर वसाहत येथे आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकू समारंभास शहरातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला, यावेळी
महिलावर्गासाठी उखाणे, संगीत खुर्ची असे विविध खेळ तसेच श्री. नारायणी भगिनी मंडळ यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता, या सर्वाचा महिलांनी मनसोक्त आनंद लुटला, फक्त हळदी -कुंकू कार्यक्रम न होता धमाल व मनोरंजन झाल्याने अनेक महिला भगिनींनी या आयोजनाबद्दल प्रशंसा केली व आभार मानले, या हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या सहकार्याने शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी केले होते, तसेच यावेळी महिला उपतालुकाध्यक्ष द्वारका नंदाणे, शहरअध्यक्ष अंजली सावंत, उपशहरअध्यक्ष शिल्पा कुंभार, सचिव सारिका शर्मा,सपना नंदाणे, तृप्ती नंदाणे, मीनल बावणे, रिंकू अहिरकर, शारदा कोल्हे, वैशाली चिकटे, रत्ना नेमाडे, मनिषा ठाकूर, सुनिता श्रीनाथ, शीला श्रीनाथ, निर्मला बावणे, प्रतिभा नंदाणे, शारदा बावणे, सुषमा कवडकर, प्रमिला धारपकर, वंदना चिकटे, रिया सुर्वे, रजनी सुर्वे, प्रमिला श्रीनाथ, अरुणा पेटकर, शारदा मुळे, कादंबरी शिंदे, अक्षता सुर्वे, अनु सुर्वे, श्रुतिका चव्हाण, अदिती वळंजू आदि महिला पदाधिकारी व महाराष्ट्रसैनिक उपस्थित होत्या, तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसे परिवहन सेना राज्य उपाध्यक्ष सुनील साळवी, उपशहरअध्यक्ष गौरव चव्हाण, विभागअध्यक्ष सर्वेश जाधव,शैलेश मुकादम,शेतकरी सेना उपजिल्हाध्यक्ष भाई साळवी,शेतकरी सेना तालुका सचिव सतिश खामकर,माजी शहराध्यक्ष अरविंद मालाडकर,मार्विक नारकर,अथर्व शिंदे,निखिल आंब्रे, इम्रान नेवरेकर, नवनाथ कुड, प्रदीप साळुंखे यांचे योगदान लाभले.