
मिनाल नाखरेकर यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त कृतज्ञता समारंभ संपन्न
अ. के. देसाई हायस्कूलच्या १९९४/९५ बॅचकडून आयोजन
रत्नागिरी:- मराठा मंदिर अ. के.देसाई हायस्कूल चे शिक्षक रत्नागिरीतील उत्कृष्ट कबड्डीपटू ते मराठी विषयाचे, शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक मिनाल मधुकर नाखरेकर सर दिनांक ३१ जानेवारी-२०२४ रोजी आपल्या सेवेची ३३ वर्षे पूर्ण करून सेवा निवृत्त झाले. नाखरेकर सरांच्या सेवानिवृत्ति कार्यक्रमात साल १९९४/९५ च्या बॅचनी सरांना पुढील सुखद जीवनाच्या शुभेच्छा दिल्या व सरांची कृतज्ञता सुध्दा व्यक्त केली.
शिक्षकांच्या गुरुऋणातून कोणीही विदयार्थी कधीच मुक्त होऊ शकत नाही हे खरेच आहे पण आपल्या गुरुजनांविषयी आपला आदरभाव किंवा कृतज्ञता व्यक्त करणे सहज शक्य आहे. नेमक्या याच कारणासाठी या कार्यक्रमाचे आयोजन १९९४/९५ बॅचच्या माजी विद्यार्थी वर्गाने केला होता.
तुम्ही आमचे शिक्षक होतात हे आमचे परमभाग्यच म्हणायचे ! तुम्ही आपल्या कष्टांची मोठी गुंतवणूक करून आमच्या जीवनाला चांगला आकार दिलात, त्यासाठी आमच्या मनाची निगुतीने मशागत केलीत. सद्भावना, सद्विचार, प्रेम, वात्सल्य, बंधुभाव यासोबतच माहिती, ज्ञानक आणि शहाणपणाची बीजे आमच्यात खोलवर रुजविलीत तुम्ही !
आज आपण जरी निवृत्त होत असलात तरी तुमची शिकवण आणि उत्साह आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करेल. अ. के. देसाई हायस्कूल, साल १९९४/ ९५ ची बॅचचे विद्यार्थी- प्रविण वाघेला, गणेश शेंडे, सचिन झगडे, अतुल तांबट, नंदकुमार चावरे, वर्षा मिरकर, जोत्स्ना कदम, किशोरी गंगावणे, सुनिल ठीक, संदेश पवार, राहूल भाटकर, नागेश पाडावे, सचिन राठोड, अमित भाटकर , दीपक सनगरे, सुशिल कुबल, विजय कोळेकर, लक्ष्मण बोरा, मनोहर हातफळे, आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी ग्रुप कडून श्री. नाखरेकर सर यांना शाल, श्रीफळ, पुच्छ गुच्छ व भेट वस्तु देऊन शुभेच्छा दिल्या.
