
सिध्देश शिवलकर यांचा समर्थकांसह शिवसेनेत जाहिर प्रवेश
रत्नागिरी :शिवसेना रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत, शिवसेना नेते श्री किरण सामंत व श्री सुदेश मयेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री सिध्देश शिवलकर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहिर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी महिला शहर अध्यक्षा सौ नेहाली नागवेकर, माजी शहर उपाध्यक्षा सौ संजना जोशी, कर्ला ग्रा.प सदस्य श्री फैयाज डोंगरकर व सौ सिमाताई डोंगरकर, गावखडी प.स गण अध्यक्ष श्री सागर भोसले, पावस युवक तालुका सरचिटणीस श्री मनीष गुरव, चाफे बुथ अध्यक्ष श्री राजेश मोरे, माजी शहर उपाध्यक्ष श्री लिलाधर नागवेकर, महिला कार्यकर्त्या सौ नाजीया बांदिरकर, मांडवी चे श्री निशिकांत वारंग, सौ रिनाताई वारंग, सौ पूर्वा पाटील, रनपार चे श्री संकेश पाटील, कोहिनूर हेरिटेज सी विंगचे सचिन पांचाळ, खालची आळीचे श्री मधुकर सनगरे, श्री अभिजित आग्रे, पेठ किल्ला चे श्री विनय तारी, म्हामूवाडी मजगावचे श्री कैलास सुर्वे, श्री मिलिंद पाटील, श्री पंकज शिवलकर, श्री शफीक बोरकर, पोलीस पाटील श्री तेजस वाडकर, श्री रिहान मुल्ला तसेच श्री श्रीकांत भट, चांदोरचे श्री दयानंद फटकरे आदी पदाधिका-यानी केला शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
रत्नागिरीच्या विकासासाठी झटत असलेले नेतृत्व श्री उदय सामंत, श्री किरण सामंत; श्री सुदेश मयेकर यांचे नेतृत्व मी स्विकारले तसेच सर्व रत्नागिरी तालुका जिल्ह्यातील तरूणांनी स्विकारावे विकास हा सामंतच करू शकतात असे श्री सिध्देश शिवलकर यांनी सांगितले.