
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रामकुंड वळणावर अर्टिगा गाडी दरीत कोसळली
संगमेश्वर:- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर रामकुंड वळणावर शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान आर्टिका गाडी चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने गाडी दरीत कोसळली. सुदैवाने ग्रामस्थांनी रात्रीच्या दरम्यान मदत देऊन प्रवाशांचे प्राण वाचवले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रामकुंड वळणावर रात्रीच्या दरम्याने रत्नागिरीकडे जाणारी आर्टिका गाडी कोसळली. रात्री दीड वाजता दरम्यान गाडी दरीत कोसळल्याने प्रवाशानी एकच हंबरडा फोडला. याच दरम्याने शिवसेना उबाठा गटाचे विभागप्रमुख सिद्धेश सावंत घरी जात असताना दरीमधून वाचवा म्हणून कोणीतरी ओरडत असल्याचे त्यांनी ऐकले. त्यांनी खाली लक्ष टाकून पाहिले असता अपघातग्रस्त गाडी दिसली त्यांनी सदरची बाब ग्रामस्थांना सांगितली. .
ग्रामस्थांनी मदत कार्य राबवत जखमीना वरती काढले; यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता. सुदैवाने अपघातामध्ये प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे