
‘त्या’ दोघा चोरट्याना न्यायालयीन कोठडी
चिपळूण : कापसाळ परिसरात असलेल्या एका शेतघरातून ११ हजार ९०० रुपये किंमतीचे साहित्य चोरल्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी कामथे व कापसाळ येथील दोघा चोरट्यांना अटक केली होती. शनिवारी त्या दोघाना न्यायालयात हजर केले असता त्याना न्यायालयीन कोठडी प्राप्त झाली आहे.
या बाबतची फिर्याद महेश महादेव कांबळी दिली होती. २० जानेवारी रोजी कांबळी यांच्या कापसाळ माटे सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या शेतघरातून ११ हजार ९०० रुपये किंमतीचे साहित्य चोरीस गेले होते. ते सचिन शिंदे व कृष्णा कासार या दोघांनी चोरून नेले होते. या प्रकरणी त्या दोघाना चिपळूण पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.