
मेरा देश मेरी पहचान… कारगिल विजय रजत महोत्सवाचे तयारी पूर्ण
रत्नागिरी : लक्ष फाऊंडेशन पुणे आयोजित मेरा देश मेरी पहचान… कारगिल विजय रजत महोत्सव
प्रमोद महाजन क्रीडा संकुल रत्नागिरी आज शनिवार सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.
राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन ५५०० शालेय मुलांची उपस्थिती असणार आहे. माजी सैनिक, एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी वाहतूक संघटना व विद्यार्थी पालकांचा सहभाग असणार आहे. या महोत्सवासाठी उल्हासपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख पाहुणे वीर योध्ये आणि अनुराधा प्रभुदेसाई यांचे रत्नागिरीत आगमन झाले आहे.

